आज आपण हॉटेल व्यवसाय बदल माहिती पाहू. भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा एक चांगला व आकर्षक व्यवसाय आहे. आणि तो व्यवसायासाठी एक चांगला पर्याय आहे, कारण भारतामध्ये मुख्य आकर्षण विविध प्रकारच्या संस्कृती यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणी पुढेही अशीच वाढत जाईल. म्हणूनच भारतामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करणे एक फायद्याच्या व्यवसाय असू शकतो.
तुम्ही भारता मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी येथे महत्वाचे मार्गदर्शन केले आहे ते नकी वाचा.
आपण कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय स्थापन करणार आहात. ( हॉटेल व्यवसाय माहीती )
Contents
- 1 आपण कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय स्थापन करणार आहात. ( हॉटेल व्यवसाय माहीती )
- 2 हॉटेल व्यवसाय लॉजिस्टिक
- 3 हॉटेल च क्षेत्र निश्चित करा ( आकार )
- 4 हॉटेल लेआउट योजना
- 5 आपल्या हॉटेल साठी आर्थिक वित्त पुरवठा कसा मिळु शकेल.
- 6 हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आणी त्याच्या अभ्यासासाठी बाजाराचे पूर्णपणे सर्वेक्षण करा.
- 7 हॉटेल परवाना कसा घ्यायचा How to get a hotel license
- 8 भारतामध्ये हॉटेल व्यवसाय साठी कोणकोणते परवाने ( License ) घ्यावे लागतात.
- 9 हॉटेल व्यासायसाठी कर्मचारी भरती Recruitment for hotel business
- 10 हॉटेलची जाहिरात कशी करावी आणि रेटिंग ( हॉटेल व्यवसाय माहिती )
आपण प्रत्यक्षात हॉटेल व्यवसाय सुरुवात करण्यापूर्वी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारचे हॉटेल चालू करणार अहात यावर पहील्यांदा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्या प्रकारा मध्ये आपण कॅटरिंग व्यवसाय किंवा राहण्याची सोय असलेले हॉटेल ( रेस्टॉरंट ) वगैरे हॉटेल किंवा लहान रेस्टॉरंट त्या मध्ये असू शकत. त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचा घटक म्हणजे हॉटेलची जागा किंवा स्थान. स्थान निश्चित करताना पर्यटक स्थळ, पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, नागपूर, यासारख्या सिटी मध्ये किंवा कोणत्याही हिल स्टेशन वर चालू करणे हॉटेल व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
Related Article
28 बिझिनेस IDEA IN MARATHI | SMALL BUSINESS IDEAS IN MARATHI
हॉटेल व्यवसाय लॉजिस्टिक
आपला हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे व यशस्वी करण्यासाठी हॉटेल व्यवसायात योग्य प्राथमिक सुविधा आणि वाहतूकी साठी सुविधा असणे ही एक महत्वाची गरज आहे. कारण लोकांना हॉटेलमध्ये जाण्यासाठी वाहन सहज व सुलभ भेटणे गरजेचे आहे. हॉटेल हे वाहनांची सुविधा असलेल्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शॉपिंग मॉल्स, विमानतळ, Highway आशा ठिकाणी असू शकत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बसस्थानक, शॉपिंग मॉल्स, विमानतळ, Highway या भागात अधिक लोक आपल्या हॉटेलकडे आकर्षित होण्याची शक्यता असते आणि त्या मुळे तुम्हाला मोठा महसूल मिळेल.
हॉटेल च क्षेत्र निश्चित करा ( आकार )
हॉटेल क्षेत्र निश्चित करण्यासाठी ते सर्व आपल्या हॉटेलच्या आकारावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. जर आपण 70-90 रूम मीडयम प्रकारच्या हॉटेलसाठी प्लॅनिंग निश्चित करीत आहात तर अंदाजे क्षेत्र 9000-50000 चौरस फूट असू शकत. 90 किंवा 100 पेक्षा अधिक व मोठ्या खोल्या असलेल्या 5 star हॉटेलसाठी, आपण सुमारे 100,0020 चौरस फूट पुढे जाऊ शकता.
हॉटेल लेआउट योजना
आपल्या हॉटेलच्या लेआउट पण एक महत्वाचा भाग आहे आपल्या हॉटेल चा लेआउट नियोजनासाठी, आपण इंटिरियर डिझाइनर्सची व्यापाऱ्यांची मदत घेऊन आपल्या बजेटमध्ये आपल्याला उत्कृष्ट आणि आकर्षक प्रोजेक्ट देऊ शकतील. ते आपल्याला सुंदर आणि पर्यटकांना हवे असे लेआउट करून देतील आणि पर्यटकांना देखील आकर्षित करू शकतील. महाराष्ट्र मध्ये असे व्यावसायिक इंटिरियर डिझाइनर्सच्या आपल्याला खूप प्रमाणात भेटीला त्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी आपण इंटरनेट मधील जाहिरात पाहू शकता आणि जाहिरातीं मध्ये देखील पाहू शकता.
आपल्या हॉटेल साठी आर्थिक वित्त पुरवठा कसा मिळु शकेल.
जेव्हा आपल्याकडे आर्थिक सहाय्य कमी असेल. जर आपल्याला आर्थिक बाबी आवश्यक असेल तर महाराष्ट्रा मध्ये तुम्ही अनेक खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून हॉटेल व्यवसायासाठी वित पुरवठा घेऊ शकता. साधारणतः, 30% रकमेची व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे आणि आणि उरलेली 70% रक्कम तुम्हाला बँका पुरवठा करू शकतील. जेव्हा तुम्ही बँकेकडे जाणार तेंव्हा तुम्हाला हॉटेलच्या सम्पूर्ण बजेटबाबत त्या अगोदरच निर्णय घेणे गरजेचे आहे.
कर्ज देण्यापूर्वी बँका तुमची सर्व बाजूने विश्वासार्हता चेक करतील आणि आणि त्या व्यक्तीची दायित्व तपासतील.
हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आणी त्याच्या अभ्यासासाठी बाजाराचे पूर्णपणे सर्वेक्षण करा.
तुम्ही जेथे हॉटेल सुरू करण्याचा विचार करीत आहात तेथे आपल्या हॉटेल व्यवसायाची गरज आणि व्याप्ती जाणून घेणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हांला हॉटेलच्या स्थानाच्या आजूबाजूला 10 कि.मी. अंतरावर तुम्हाला बाजारपेठेचे पूर्णपणे सर्वेक्षण करावे लागेल. म्हणजेच हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी चालू केल्यानंतर फायदेशीर ठरेल की नाही हे पहाण्यासाठी आपल्याला मदत करेल. जर त्या ठिकाणी अशाच हॉटेल्समधून कोणतीही स्पर्धा असेल, तर आपण ग्राहकांसाठी नवनविन ऑफर करण्यासाठी एक वेगळी सुविधा आणि वैशिष्ट्यांसह हॉटेल व्यवसाय योजना तयार करू शकता. आपल्याकडे हॉटेल मध्ये ऑफर करण्यासाठी काहीतरी नवीन असल्यास आपण अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकाल.
हॉटेल परवाना कसा घ्यायचा How to get a hotel license
जेव्हा तुम्ही हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेता , त्या नंतर पुढची स्टेप म्हणजे हॉटेल परवान्यासाठी पुढे जाणे. जर तुम्हाला हॉटेलमध्ये बार / मद्य व इतर सुविधेसाठी योजना तयार करत असाल तर तुम्हाला त्या सुविधे साठी परवाना घेणे आवश्यक असेल. आणि हॉटेल व्यवसाय स्थापन करण्यासाठी साठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे गरजेचे आहे. जर पुढे आपल्या हॉटेल आवारात तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही त्याचा एक वेगळा परवाना घेणे आवश्यक आहे.
भारतामध्ये हॉटेल व्यवसाय साठी कोणकोणते परवाने ( License ) घ्यावे लागतात.
अन्न सुरक्षा परवाना – तुम्हाला FSSAI (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) कडून परवाना घ्यावा लागेल.
आरोग्य / व्यवसाय परवाना – हा परवाना तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्थानिक नागरी प्राधिकरणाकडून भेटू शकतो.
Eating घराचा परवाना – हा परवाना तुमच्या शहरातील परवानाधारक पोलिस आयुक्तांकडून भेटेल.
दारू परवाना – जर तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये बार / मद्य आशा सुविधा ठेवणार आहात तर तुमच्या शहरातील स्थानिक उत्पादन शुल्क आयुक्तांकडून तुम्हाला हा परवाना घ्यावा लागेल.
अग्निशमन परवाना घ्यावा लागेल – हे आपल्या स्थानिक शहरातील अग्निशमन विभागाकडून भेटू शकतो.
हॉटेल व्यासायसाठी कर्मचारी भरती Recruitment for hotel business
तुम्हला आपल्या हॉटेल साठी कर्मचारी देखील अवशक्य आहेत. हॉटेलच्या आकार आणि गरजेनुसार अनुभवी किंवा फ्रेश कर्मचारी भरती करावी लागेल. हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसचे कर्मचारी, सुपरवायझर, हाऊसकीपिंग, लाईन मॅनेजर, वेटर, इत्यादीचा समावेश होतो. तुम्ही जाहिराती द्वारे किंवा प्लेसमेंट एजन्सीतुन भरती करू शकता.
हॉटेलची जाहिरात कशी करावी आणि रेटिंग ( हॉटेल व्यवसाय माहिती )
हॉटेल सुरू करतांना आपल्या व्यवसायासाठी भारतीय पर्यटन मंडळाकडून रेटिंग घ्यावी लागेल. सर्वसामान्य रेटिंग्स 1-, 2-, 3-, 4-, 5 या प्रकारे असू शकते. आपल्या हॉटेल ची जाहिरात केलास नकीच हॉटेल च्या कमाईत वाढ होऊ शकते म्हणून आपल्या हॉटेल ची जाहिरात भारत भर व विदेशात सुद्धा गरज असेल तर करावी.
आपला स्वतःच हॉटेल व्यवसाय अधिक फायदेशीर कसा बनवू शकेल? आपल्याला काय वाटते? त्या तुम्ही इथे टिपणी द्वारे बोला.